ताज्या बातम्या

Cm devendra fadnavis : पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा मृत्यू ,फडणवीसांनी सांगितला आकडा

सध्या राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीड, मराठवाडा, अहिल्यानगर यांसह अनेक भागांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • सध्या राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

  • पूर आणि अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू

  • बीड, मराठवाडा, अहिल्यानगर यांसह अनेक भागांना मुसळधार

सध्या राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीड, मराठवाडा, अहिल्यानगर यांसह अनेक भागांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कुठे अतिवृष्टी झाली आहे, कुठे पूर आला आहे, कोणत्या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे, याबद्दलचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सध्या इतका पाऊस पडलाय जो सरासरीच्या १०२ टक्के इतका आहे. काही भागत पूरस्थितीमुळे लोक अडकले आहेत. बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. धाराशिवमध्येही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून २७ लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने बाहेर काढलं. २०० लोकांना अजून वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. सध्या आमच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे तिथे पोहोचले आहेत. त्यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्याबद्दलही सध्या मी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विशेषत अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या या त्या ठिकाणी काम करत आहेत. काही आठवड्यांपूर्वी आपण शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यावेळी आपण जसे पंचनामे येतील, तशी मदत केली जाणार आहे. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत करण्याचे जीआर काढलेले आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले.

पूरग्रस्त भागांना भेटी द्या

यातील १८२९ कोटी हे जिल्ह्यात जमाही झालेले आहेत. यानंतर पुढच्या ८ ते १० दिवसात हे पैसे आम्ही जमा करणार आहोत. हे सर्व पैसे जमा होतीलच, त्यासोबत अद्यापही या ठिकाणी काम थांबलेलं नाही. नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय. त्या ठिकाणी पंचनामे करणं आणि मदत करणे हे काम सातत्याने सुरु राहणार आहे. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यात काम सुरु आहे. ते काय थांबलेलं नाही. आता एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर त्यांना मदत करुन टाकायची, असे धोरण ठेवलं आहे. जेणेकरुन तातडीची मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्यांना मदत करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. तसेच ज्यांचे पुरामुळे नुकसान झालं अशा लोकांनाही मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. आज मंत्रिमंडळात याचा आढावा घेण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतला आहे. उद्या पालकमंत्र्यांना किंवा मंत्र्‍यांना या पूरग्रस्त भागात त्यांनी भेटी द्यायच्या आहेत, अशी सूचना केली आहे. मी देखील काही भागांमध्ये जाणार आहे, अशाही सूचना मुखअयमंत्र्यांनी केल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Suresh Dhas : पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषणा

Flipkart Big Billion Sale : फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोठा झोल, Iphone ची ऑर्डर आपोआप रद्द?

Make Fasting Gulab jamun during Navratri : आता नवरात्रीमध्ये बनवा उपवासाचे गुलाबजाम

National Film Awards 2025 : शाहरुख खानला त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर! जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी