Gunaratna Sadavarte : सदावर्तेंचा खोचक टोला, लोक मुलीला नांदायला पाठवतात, पण जरांगे ... Gunaratna Sadavarte : सदावर्तेंचा खोचक टोला, लोक मुलीला नांदायला पाठवतात, पण जरांगे ...
ताज्या बातम्या

Gunaratna Sadavarte : सदावर्तेंचा खोचक टोला, लोक मुलीला नांदायला पाठवतात, पण जरांगे ...

सदावर्तेंचा टोला: जरांगे पाटीलांनी सासुरवाडीला नांदायला जाण्याची नवी परंपरा सुरु केली.

Published by : Riddhi Vanne

सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. मनोज जरांगेंनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण केले. यानंतर सरकारने जरांगेंच्या 7 पैंकी 5 बातम्या केल्या. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे. परंतू या गॅझेटला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला असून मराठा आणि ओबीसी समाज आमनेसामने आले. जालन्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी करत आंदोलनाला सुरुवात केली. आज ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्तेंनी जालन्यात जाऊन धनगर समाजाच्या आंदोलकांना भेट दिली. दरम्यान माध्यमांशी संवाद साधला आहे. माध्यमांशी बोलताना सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर हल्लाबोल करत खोचक टिप्पणी केली.

जालन्यात प्रवेश करत असताना सदावर्तेंची गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस हा हल्ला मनोज जरांगेंच्या समर्थकांनी हल्ला केला असा आरोप देखील सदावर्ते यांनी केला आहे.

सदावर्ते म्हणाले की, "ज्यांना संविधान माहिती नाही ते असे हल्ले करतात, जिसका कोई होता, उसका गुणरत्न सदावर्ते होता है अशी शेरोशारी सदावर्तेंनी केली. माझ्या धनगर बांधवांसाठी आरक्षण मिळवण्यासाठी मी इथे आलो आहे. मराठा बांधवांना ओबीसीमध्ये एन्ट्री मिळणार नाही" असं म्हणत सदावर्तेंनी जरांगेंना टोला लगावला.

पुढे सदावर्ते म्हणाले की, "लोक नांदायला पाठवतात, मात्र जरांगे पाटीलांनी नवीन परपंरा सुरु केलीये, ती म्हणजे जरांगे स्वत: नांदायला सासुरवाडीला आलेत, असं सदावर्ते यांनी म्हटलेलं. जरांगेयानी मराठा बांधवांची फसवणूक केली. जरांगे आता लवकरच तुमचं गाठोडं बांधलं जाणार आहे, असा इशाराही यावेळी सदावर्ते यांनी जरांगेयांना दिला. दरम्यान आता आपली पुढची भेट अंतरवाली सराटीमध्येच होईल" असंही सदावर्ते यांनी जरांगे पाटीलांना म्हटलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा