ताज्या बातम्या

Maratha Reservation : आमरण उपोषण सुरु राहणार! जरांगेचा निर्धार

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहात मध्यरात्रीपर्यंत बैठक पार पडली. त्यानतंर आज अर्जून खोतकर यांनी राज्य सरकारचा निरोप घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आमरण उपोषण सुरुच राहणार असल्याच स्पष्ट केलं आहे.

अर्जून खोतकर यांनी राज्य सरकारचा निरोप घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मात्र, या खोतकर यांनी सरकारकडून आणलेल्या जीआरमध्ये दाखले कधीपासून मिळणार याचा उल्लेख केला नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. गेल्या 12 दिवसांपासून जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. जरांगे उपोषण मागे घेतात का याकडे लक्ष लागले होते. परंतू सरकारच्या जीआरने त्यांचे समाधान झाले नसल्याने आमरण उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मी सुद्धा या उपोषणात सहभागी आहे. सरकारने रात्री नवीन जीआर काढला आहे. सरकारने दिलेले पत्र मी जरांगे यांना दाखवलं. त्यांचा हा लढा यशाच्या दिशेने गेला पाहिजे. या लढ्यामध्ये आम्ही मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या सोबत आहोत असं अर्जून खोतकर म्हणाले.

रायगडच्या खरिवलीतील आदिवासी महिलांचा मतदानावर बहिष्कार

Balasaheb Thorat : 4 तारखेला नवीन सरकार बनणार

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव