Manoj Jarange : मनोज जरांगे-पाटीलांचे भावनिक वक्तव्य; आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढण्याची भूमिका Manoj Jarange : मनोज जरांगे-पाटीलांचे भावनिक वक्तव्य; आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढण्याची भूमिका
ताज्या बातम्या

Manoj Jarange Dasara Melava : मनोज जरांगे-पाटीलांचे भावनिक वक्तव्य; आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढण्याची भूमिका

दसऱ्याच्या निमित्ताने नारायणगडावर आयोजित कार्यक्रमात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी भावनिक भाषण केले.

Published by : Riddhi Vanne

दसऱ्याच्या निमित्ताने नारायणगडावर आयोजित कार्यक्रमात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी भावनिक भाषण करत महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आपल्या आरोग्याबद्दल बोलताना ते भावुक झाले आणि "मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, पण माझ्या डोळ्यांसमोर मराठा लेकरांना आरक्षण मिळालेले पाहायचे आहे," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. समाजातील गरीब विद्यार्थ्यांचे आणि कुटुंबांचे कल्याण हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाने 75 वर्षांच्या संघर्षानंतर शासकीय निर्णय मिळवला आहे, ही मोठी ऐतिहासिक जिंक आहे. "मी माझ्या आयुष्यात जे सिद्ध करायचे होते, ते केले आहे. माझ्याकडून चुका झाल्या असतील, कधीतरी मागेही सरकलो असेल, पण कधीही नाटक केले नाही किंवा खोटे बोललो नाही," असे त्यांनी नमूद केले. त्यांनी 6 कोटी मराठा समाजाला समाधानात राहण्याचे आणि मिळालेल्या आरक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या आंदोलनात गद्दारी करणाऱ्यांवर कठोर टीका केली. सातारा आणि मराठवाड्यातील काही लोकांनी केलेली फितुरी समाजाच्या हिताविरुद्ध असल्याचे ते म्हणाले. "फक्त दोन वर्षांत 3 कोटी गरीब मराठे आरक्षणात आले आहेत, गावोगाव कुणबी निघाले आहेत. त्यामुळे समाजाने हुशारीने वागत संघर्षाचे फळ जपावे आणि अडचणीत न आणावे," असा ठाम संदेश त्यांनी नारायणगडावर दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा