मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरुच आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणावर आज सर्वपक्षीय बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.
मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. जालन्यात उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सर्वच पक्षातील नेतेमंडळी येत आहेत.