Maratha Samaj against Munde brother and sisters 
ताज्या बातम्या

'मुंडे बंधू -भगिनींना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको', मराठा समाजाची मागणी

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मंत्री धनंजय मुंडेंना देऊ नये, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. आता नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मुंडेंना नको, अशी भूमिका नांदेडमधील मराठा समाजाने मांडली आहे.

Published by : Gayatri Pisekar

परळीतील मुंडेंचा गढ ढासळतोय की काय असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागलं असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जाणारा वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कृषी विभागमध्ये साहित्य घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटी धोरण रद्द केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. नागपूर खंडपीठाने याबाबत राज्य सरकारला २ आठवड्यात उत्तर मागितलं आहे.

बीडच्या बालेकिल्ल्यात वाढता विरोध

बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सर्वपक्षीय आंदोलनामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना तीव्र विरोध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात केली. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मंत्री धनंजय मुंडे यांना देऊ नये, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी बीडमधील लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केली आहे.

नांदेडमधूनही मुंडे यांना विरोध

बीडनंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मुंडेंना नको, असा सूर उमटत असून नांदेडमधील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आज ती भूमिका मांडली. त्यामुळे, पालकमंत्रीपदावरुन मुंडे अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले मराठा समन्वयक?

राज्यातील जनता म्हणत असेल की बीडचा बिहार झालाय. आम्हाला नांदेडचं बीड होऊ द्यायचं नाही. नांदेड एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मराठवाड्याची राजधानी म्हणून नांदेड ओळखलं जातं. त्यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने नांदतात. बीडमधील संस्कृती नांदेडमध्ये रूजवण्याचा प्रयत्न करू नये म्हणून नांदेडचं पालकमंत्रिपद मुंडे बंधू-भगिनींना देऊ नये अशी मागणी मराठा समन्वयकांनी केली आहे.

पालकमंत्र्यांची नावे कधी जाहीर करणार?

राज्यात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापू्र्वीच पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली जातील. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला जाण्यापूर्वीच ही नावे जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होणार आहेत.

त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील जनभावना पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री धनंजय मुंडे यांना बीड किंवा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...