वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण संपूर्ण देशात चर्चेत आलं आहे. तिच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. त्यातच अभिनेत्री दिपाली सय्यद यांनीही वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वैष्णवीला न्याय मिळायलाच हवा, असं म्हटलं आहे. शिवाय आपण कस्पटे कुटुंबाची भेट घेणार असल्याचंही दिपाली यांनी म्हटलं आहे. दरम्यान, वैष्णवीला त्रास होतोय हे समल्यावर तिच्या आई-वडिलांनी तेव्हाच तिला का स्वतःच्या घरी आणलं नाही. तेव्हाच वैष्णवीच्या पाठिशी राहिले असते तर आज वैष्णवी जीवंत असती, असा प्रश्न आपम कस्पटे कुटुंबाला करणार असल्याचंही दिपालीनं म्हटलं आहे.