ताज्या बातम्या

BMCElection 2026 : मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या उमेदवार यादीत मराठी अभिनेत्री निशा परुळेकरची नावे समोर आली

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पहिल्या उमेदवार यादीत चर्चेत असलेल्या मराठी अभिनेत्री निशा परुळेकरचा समावेश केला आहे.

Published by : Varsha Bhasmare

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पहिल्या उमेदवार यादीत चर्चेत असलेल्या मराठी अभिनेत्री निशा परुळेकरचा समावेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे दोन दिवस 29 आणि 30 डिसेंबर शिल्लक आहेत. मुंबई महापालिकेतील 227 प्रभागांमध्ये निवडणूक होणार असून, मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा यासाठी पणाला लागली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत 66 उमेदवारांचा समावेश असून, रात्री काही उमेदवारांना एबी फॉर्म्स दिले गेले. या यादीत चर्चेचा विषय ठरलेली नवी उमेदवार म्हणजे अभिनेत्री निशा परुळेकर. निशा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’, ‘बाबो’, ‘पारख नात्यांची’, ‘प्रेमाचे नाते’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

निशा परुळेकर यांचा जन्म 19 सप्टेंबर 1974 रोजी मुंबईत झाला. त्यांनी चेंबूरमधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. 2011 मध्ये ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’ या चित्रपटात रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी भरत जाधवसोबत ‘सही रे सही’ नाटकात काम केले आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत महालक्ष्मी अंबाबाईची भूमिका साकारल्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात विशेष ओळख मिळवली आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यानंतर निशा परुळेकर यांनी राजकारणात पाऊल टाकले असून आता भाजपच्या झेंडा हाती घेतला आहे. मुंबई महापालिकेतील निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे कारण 2017 मध्ये भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, पण महापालिकेवर झेंडा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. भाजपने पहिल्या यादीत रणरागिणींचा समावेश करून मुंबई महापालिकेत आपली पकड मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस लवकरच येणार आहे, आणि पक्षाच्या आगामी रणनीतीवर निशा परुळेकरची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा