ताज्या बातम्या

"नात्यात माझी फसवणूक...", सई ताम्हणकारने आयुष्यातील सांगितला 'तो' कठीण प्रसंग

नुकतेच तिने तिच्या आयुष्यातील खासगी आयुष्यातील काही प्रसंगांबद्दल सांगितले आहे.

Published by : Shamal Sawant

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या खूप चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीबरोबर तिचा एक चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. मात्र तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत आलेली बघायला मिळते. सई तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलासपणे भाष्य करताना दिसते.

नुकतेच तिने तिच्या आयुष्यातील खासगी आयुष्यातील काही प्रसंगांबद्दल सांगितले आहे. नात्यांबद्दल आलेल्या वाईट अनुभवांवर तिने भाष्य केले आहे. कमी वयातच नात्यामध्ये वाईट अनुभव आल्याचे सईने सांगितले आहे. सई 15 डिसेंबर 2013 साली अमेय गोस्वामीबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र 2015 साली त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही वर्षांनी ती अनिश जोगबरोबर रिलेशनशिपमध्ये आली. मात्र त्यांचंदेखील काही काळानंतर ब्रेकअप झाल्याचे तिने सांगितले.

दरम्यान सईने तिच्या नातेसंबंधावर भाष्य केले आहे. जोडीदाराने तिची फसवणूक केल्याचे सई म्हणाली. जर एखादा जोडीदार फसवणूक करत असेल तर त्याने ते कबूल करण्याचे धाडस केले पाहिजे असेही सई म्हणाली. नातेसंबंधातून यातून बरंच काही शिकल्याचंही सई म्हणाली. सई म्हणाली की, "माझ्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात मला नात्यांमध्ये वाईट अनुभव आला. पण या सगळ्यातून मी चांगलच धडे घेतले. मला असंही वाटतं की एका माणसोबत आपलं संपूर्ण आयुष्य घालवणं ही थोडं अनैसर्गिक आहे. तसंच मुलींना जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा उखरून काढायची सवय असते, मी देखील ते केलं , पण नात्यात ते झालं नाही पाहिजे", असंही सई म्हणाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा