ताज्या बातम्या

ऑनलाईन पैसे कमावणे पडले महागात; मराठी हास्यकलाकार सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. इन्स्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात 150 रुपयांचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्यांकडून तब्बल 61.83 लाख रुपयांना फसवणूक केली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका अनोळखी महिलेने फेब्रुवारी 2025 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरून सागर कारंडेशी संपर्क साधला. इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट ‘लाइक’ करण्याचे काम दिले आणि प्रत्येक लाइकसाठी Rs 150 मिळतील, असे सांगितले. दिवसाला साधारण Rs 6,000 मिळतील असे देखील सांगण्यात आले.

विश्वास बसण्यासाठी आरोपींनी कारंडे यांच्या खात्यात 22 हजार रुपये देखील पाठवल्याची माहिती मिळत आहे. टप्प्याटप्प्याने पैसे उकळून सागर कारंडेची फसवणूक करण्यात आली. वेगवेगळ्या कारणांनी पैसे गुंतवायला लावून सायबर भामट्यांनी सागर कारंडेची लाखो रुपयांची फसवणूक केली.

सुरुवातीला 11हजार रुपये दहा वेळा मिळाले, त्यामुळे त्याचा विश्वास बसला. नंतर जास्त पैसे कमवण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल, असे समोरून सांगण्यात आले. त्यानंतर सागरने रक्कम गुंतवली. आरोपींनी तयार केलेल्या वॉलेटवर कमिशन व मोबदला जमा केला. त्यानंतर 27 लाख रुपये गुंतवले. मात्र पैसे काढण्याच्यावेळी 80% टास्क पूर्ण आहे, 100% झाल्यावरच पैसे काढता येतील असे समोरुन सांगितले. त्यानंतर 19 लाख रुपये आणि त्यावर 30% कर भरा असे सांगण्यात आले. सागरकडून 61.83लाख रुपये घेण्यात आले. कर चुकीच्या खात्यात भरला गेल्याचे सांगून पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर सागरच्या मनात शंका आली आणि त्याने तक्रार दिल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा