मुंबईमध्ये अनेकदा मराठी-गुजराती हा वाद बघायला मिळतो. क्रॉफर्ड मार्केटमध्ये असलेल्या रुपम शोरूममध्ये मराठी ग्राहकाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यासाठी अरेरावी केली. या दुकानातील मॅनेजरने मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यास जबरदस्ती केली. मराठीत बोलू नका गुजराती किंवा हिंदीमध्ये बोला, असे मॅनेजर अरेरावीच्या भाषेत ग्राहकाशी बोलू लागला. या घटनेनंतर मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद पाहायला मिळाला.
या घटनेनंतर संबंधित मराठी तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे क्रॉफर्ड मार्केट येथील रुपम शोरुमला भेट दिली. त्यानंतर मॅनेजरला संबंधित घटनेचा जाब विचारला. यावेळी मॅनेजरने घटनेसंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान संतोष शिंदे यांनी मॅनेजरला मराठी बोलायला लावले आणि मराठी लोकांची माफी मागायला लावली.