अभिराज उबाळे, पंढरपूर
आज पंढरपुरात वसंत पंचमी दिवशी विठ्ठल रखुमाईचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. यासाठी मंदिराला विविध प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. भक्तांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या सजावटीसाठी गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जिप्सी, डिजी, सुर्यफुल, जरबरा, तगर, गुलछडी, कामिनी, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे.
सुमारे साडेतीन ते चार टन फुल् आणि 1टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे. ही सजावट पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी देवाच्या चरणी अर्पण केली आहे.