Team Lokshahi
ताज्या बातम्या

साताऱ्यात जादूटोणा करून विवाहित महिलेवर बलात्कार

कौटुंबिक अडचणी दुर करण्‍याच्‍या बहाण्‍याने महिलेच्या डोक्यावर लिंबू फिरवून तिला संमोहित करत तीच्‍यावर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी साताऱ्यातील मुक्‍तार नासीर शेख (वय २४) या भोंदूवर शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पोलिसांनी भोंदू शेखला ताब्‍यात घेतले असून याची फिर्याद 23 वर्षीय महिलेने नोंदवली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

कौटुंबिक अडचणी दुर करण्‍याच्‍या बहाण्‍याने महिलेच्या डोक्यावर लिंबू फिरवून तिला संमोहित करत तीच्‍यावर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी साताऱ्यातील मुक्‍तार नासीर शेख (वय २४) या भोंदूवर शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पोलिसांनी भोंदू शेखला ताब्‍यात घेतले असून याची फिर्याद 23 वर्षीय महिलेने नोंदवली आहे.

मुळची नेपाळ येथील असणारी 23 वर्षीय महिला 2019 मध्‍ये नोकरीसाठी दुबई येथे गेली होती. कामादरम्‍यान झालेल्‍या ओळखीनंतर तीने तेथीलच एकाशी लग्‍न गेले. लग्‍नानंतर त्‍यांना एक मुलगी झाली. काही दिवसांनी वाद झाल्‍याने ती मुलीसह दुबई सोडून दिल्‍लीत परतली. यानंतर ती आठ महिन्‍यांपुर्वी सातारा येथील एका नातेवाईकांकडे राहण्‍यास आली. साताऱ्यात राहणाऱ्या महिलेने पुन्‍हा मुलीसह दुबई येथे जाण्‍याची तयारी सुरु केली. यावेळी प्रत्‍येक टप्‍प्‍यावर तिला अडचणी येवू लागल्‍या. अडचणी का येत आहेत? हे जाणून घेत भविष्‍य जाणून घेण्‍यासाठी तिने साताऱ्यातील ओळखीच्‍या महिलेच्‍या मदतीने राजसपुरा पेठेतील दर्गा चालवणाऱ्या मुक्‍तार नासीस शेख याच्‍याशी संपर्क साधला.

ओळखीनंतर शेख हा 20 ऑगस्ट रोजी पीडित महिलेच्‍या घरी गेला. येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करत त्‍याने त्‍या महिलेस एका खोलीत नेले. याठिकाणी त्‍याने महिलेच्‍या डोक्‍यावरुन लिंबू फिरवत संमोहित केले. संमोहनामुळे अर्धवट शुध्‍दीवर असणाऱ्या त्‍या महिलेवर शेखने अत्‍याचार केले. शुध्‍दीवर आल्‍यानंतर त्‍या महिलेने शेखने अत्‍याचार केल्‍याची कल्‍पना कुटुंबियांना दिली. याची तक्रार पीडित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून शेख विरोधात जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पोलिसांनी शेखला ताब्‍यात घेतले असून तपास सहाय्‍यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा