भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजणाच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाला.
या स्फोटामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर पाच ते सात लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाचा आवाज जवळपास पाच किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कंपनीत दारू गोळा तयार केला जात होता.