ताज्या बातम्या

Massive Fire Breaks Out at a Godown in Bhiwandi : भिवंडीत गोदामाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट गोदाम संकुलात रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीने मोठे आर्थिक नुकसान घडवले आहे.

Published by : Riddhi Vanne

Massive Fire Breaks Out at a Godown in Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट गोदाम संकुलात रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीने मोठे आर्थिक नुकसान घडवले आहे. कुरिअर आणि केमिकल साठवलेल्या गोदामात लागलेल्या या आगीवर जवळपास दहा तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

रविवारी रात्री सुमारे 9 वाजून 45 मिनिटांनी या गोदामातून अचानक धुराचे लोट दिसू लागले आणि काही क्षणांतच संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. आग इतकी भीषण होती की, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका तसेच जिंदाल स्टील कंपनीच्या पाच अग्निशमन गाड्यांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले. अखेर रात्रीभर चाललेल्या प्रयत्नांनंतर सोमवारी सकाळी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.

आगीच्या तीव्रतेमुळे गोदामाचे संपूर्ण छत कोसळले असून, आत साठवलेला लाखो रुपयांचा माल पूर्णपणे जळून गेला. ग्रामीण भागात पाण्याची मर्यादित उपलब्धता असल्याने आग विझवण्याच्या कामात विलंब झाला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या ठिकाणी केवळ धुराचे लोट दिसत आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून दोन अग्निशमन गाड्या तेथे तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

अग्निशमन अधिकारी वजीर पटेल यांनी सांगितले की, “आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संपूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात होते. जवळील गोदामे वाचवण्यासाठी अतिरिक्त पथके बोलावली गेली आणि मोठ्या प्रयत्नानंतर ती वाचवण्यात यश आले.”

ही आग ‘शॅडो फॅक्स’ कुरिअर कंपनीच्या गोदामात लागली होती, ज्यात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन उत्पादनांचा साठा होता. प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....