धारावी पोलीस ठाणे हद्दीतील सायन बांद्रा लिंक रोड, दक्षिण वाहिनीवर, निसर्ग उद्यानाचे फुटफाथ लगत रस्त्याच्या कडेला सिलेंडर असलेल्या एक ट्रक पार्क केला होता. त्या ट्रकला आग लागून त्यामध्ये असलेल्या सिलेंडरचा विस्फोट झाला आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाला नसून आग लागलेल्या ट्रकच्या शेजारी पार्क केलेल्या साधारण तीन ते चार वाहनांचे आगीमुळे नुकसान झाले आहे.
आग लागलेल्या वाहन चालकाची ओळख निष्पन्न झाली असून सदर चालकाला ताब्यात घेण्याचं काम सुरु आहे. फायर ब्रिगेडच्या एकूण 19 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे. धारावी माहीम शाहूनगर कुर्ला विनोबा भावे नगर या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 त्यांच्या स्टाफ सहित घटनास्थळावर हजर होते.
यात आतापर्यंत कोणीही जखमी नसल्याची महिती, पण अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत, मात्र मोठे नुकसान सुद्धा झाले आहे. रात्री उशिरा एक वाजता आगीवर निर्यंत्रण मिळवण्यात आले असून आग पूर्ण विजवली आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे.