ताज्या बातम्या

Abhishek Ghosalkar : मॉरिसच्या पत्नीने पोलीस चौकशीत दिली ‘ही’ मोठी माहिती

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.

याच पार्श्वभूमीवर घटनेची संपूर्ण माहितीसाठी पोलिसांकडून मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला जात असल्याची माहिती मिळत आहे. या जबाबात मॉरिशच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की, मॉरिशच्या मनात घोसाळकर यांच्या विरुद्ध तीव्र संताप होता. अशात साडेचार महिने मॉरिस हा बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात राहून आला होता. तुरुंगातून जामीनावर घरी आल्यानंतर मॉरिस हा सारखा मी अभिषेक घोसाळकर याला सोडणार नाही. मारून टाकणार असं बोलत होता. अशी माहिती मॉरिसच्या पत्नीने पोलीस चौकशीत दिल्याचे समजते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका