थोडक्यात
निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर
१ नोव्हेंबरला महाविकास आघाडीची रॅली
मतदार यादीतील अनियमिततेविरोधात विरोधी पक्ष एकत्र येणार
राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा दुपारी १ वाजता निघणार आहे. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात येणार , हा मोर्चा फॅशन स्ट्रीट वरून निघून मेट्रो आणि त्यानंतर मुंबई महापालिकेपर्यंत येणार आहे. मुंबई महापालिकेत समोर स्टेज टाकणार असल्याची सूत्रांची माहिती
केंद्रीय निवडणूक आयोगावर सातत्याने बनावट मतदार यादी आणि मतदार यादीत फेरफाक केल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. त्यासाठी गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेटही घेतली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र दिसणार आहेत.
महाराष्ट्रातील बनावट मतदारांच्या विरोधात राज्यातील विरोधी महाविकास आघाडी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी भव्य रॅलीची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत या रॅलीत एकत्र येणार आहे. या रॅलीच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी नेत्यांना महत्त्वाच्या सुचनाही दिल्या