ताज्या बातम्या

Medha Kulkarni Protest In Pune Shaniwar Wada : गोमुत्र शिंपडलं, मजार जवळ झेंडा लावला! नमाज पठणावरून शनिवारवाड्यात मेधा कुलकर्णीचं आंदोलन

हिंदू कार्यकर्त्यांनी पुण्यातील शनिवार वाडा आवारात असलेल्या दर्गा बाहेरील दिवा काढला आहे. यावेळी तिथे पतित पवन संघटना आणि सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते जमा झाल्याचं पाहायला मिळाल आहे.

Published by : Prachi Nate

हिंदू कार्यकर्त्यांनी पुण्यातील शनिवार वाडा आवारात असलेल्या दर्गा बाहेरील दिवा काढला आहे. यावेळी तिथे पतित पवन संघटना आणि सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते जमा झाल्याचं पाहायला मिळाल आहे. थोड्याच वेळात पतीत पावन संघटना व राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी शिववंदना करणार आहेत.

यामुळे पुण्यातील शनिवार वाड्याच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त याठिकाणी पाहायला मिळत आहे. शनिवार वाड्यात असलेली पीर ही अनधिकृत असल्याचा सकल हिंदू समाजाचा आरोप आहे. तसेच शनिवार वाड्यात कोणाची ही पीर किंवा कबर नसल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे.

याठिकाणी असलेला पीरचा बोर्ड काढून टाका, हिंदू संघटनांची मागणी आहे. त्याचसोबत मेधा कुलकर्णी यांच्याकडून प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर ही आंदोलकांनी मजार जवळ झेंडा लावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा