Train Timetable : मध्य रेल्वेने 21 डिसेंबर, रविवार रोजी ठाणे आणि कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे काही लोकल गाड्या रद्द होणार आहेत आणि काही एक्स्प्रेस गाड्यांना दुसऱ्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने सांगितलेल्या माहितीनुसार, हे मेगा ब्लॉक विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 5 वी आणि 6 वी मार्गिकांवर सकाळी 9 ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत, अप मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना जलद मार्गावर वळवण्यात येईल, त्यामुळे गाड्यांचा वेळ 10 -15 मिनिटांपर्यंत वाढणार आहे.
याशिवाय, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील काही गाड्या रद्द होणार आहेत. पनवेल आणि वाशी दरम्यान हार्बर मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 वाजेपर्यंत सेवा बंद राहतील. तसेच पनवेल आणि ठाणे दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या जातील.
मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांना सूचना दिली आहे की ब्लॉक कालावधीत काही विशेष लोकल गाड्या चालवण्यात येतील. तसेच ठाणे, वाशी आणि नेरूळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध राहतील.
त्याचबरोबर, काही मेल गाड्यांचे मार्ग बदलले जातील. उदाहरणार्थ, पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस, नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन अशा गाड्या या ब्लॉकमुळे प्रभावित होणार आहेत.
MEMU गाड्यांमध्येही काही बदल होणार आहेत. वसई रोड - दिवा MEMU आणि दिवा - वसई रोड MEMU गाड्यांच्या वेळांमध्ये बदल होणार आहे आणि काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट किंवा शॉर्ट ओरिजिनेट होऊ शकतात. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त केली असून, त्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
11010 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
17611 नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस
12124 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
13201 राजगीर- लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस
17221 काकीनाडा लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
12126 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
12140 नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस
22160 चेन्नई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
12168 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
12321 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल
12812 हाटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
11014 कोयंबतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस