ताज्या बातम्या

Megablock: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर तांत्रिक कामं करण्यासाठी मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 9 जून 2024 रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 9 जून 2024 रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असतील, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असतील. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन एक्स्प्रेस मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी 11:30 ते दुपारी 3:00 पर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर धिम्या मार्गाने वळवण्यात येतील. घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर

कधी : सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि वांद्रे/गोरेगाव ते सीएसएमटी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. त्यामुळे पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान 20 मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन फास्ट मार्गावर

कधी : सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 पर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय दादर स्थानकावर काही लोकल सेवा बंद करण्यात येणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."