ताज्या बातम्या

Mumbai Megablock: मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, २८ जानेवारी रोजी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा मार्ग निश्चित करायचा आहे. अन्यथा तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी : सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.15 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील, पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल - वाशी अप आणि डाउन मार्गावर

कधी : सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 वाजेपर्यंत

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.11 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून सकाळी 11.01 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट - मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी : सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 वाजेपर्यंत

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान यूपी आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 पर्यंत ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि देखभालीसाठी 5 तासांचा ब्लॉक असेल असे पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या सर्व धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गाकडे वळवण्यात येतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

Homeopathic Doctor : आजपासून आझाद मैदानात होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Shashikant Shinde : शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत, विविध मुद्द्यांवर चर्चा