ताज्या बातम्या

Mega Block: घटस्थापनेच्या दिवशीच तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Published by : Team Lokshahi

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर शनिवारी- रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य व हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक?

कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान 5 व्या आणि 6 व्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाउन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व सर्वा गाड्या गंतव्य स्थानावर 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11:16 ते सायंकाळी 4:47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता मेगाब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10:48 ते सायंकाळी 4:43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9:53 ते दुपारी 3:20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.

गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10:45 ते सायंकाळी 5:13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...