Pune
Pune  Team Lokshahi
ताज्या बातम्या

आमदार नसुनही गाडीवर ‘विधानसभा सदस्य’ स्टिकर; पोलिसांनी केली कारवाई

Published by : Sagar Pradhan

विकास कोकरे |बारामती: पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आपल्या खाजगी चार चाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून एक महाभाग फिरवत होता सासवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली त्याला सहा हजार पाचशे रुपयांचा दंड सासवड पोलीस यांनी केलाय तर या कारवरील हे स्टीकर सुद्धा त्याच्या कार वरून हटवला.

सासवड शहरात काही चार चाकी वाहनावर एक गोलाकार स्टिकर यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून आले होते. जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना एक क्रेटा गाडी मिळाली. त्या गाडीवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते. गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली परंतु गाडीमध्ये आमदार कोणीही नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी गाडी मालक ऋतुराज गायकवाड याला ताब्यात घेत गाडी पोलीस स्टेशनला आणून गाडीचा लोगो जप्त केला.मोटार वाहन कायद्याप्रमाणे गाडी मालकाला ६५०० रुपये दंड करण्यात आल्याची माहिती सासवड पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...