थोडक्यात
सोनू सूदच्या “हॉटेल लव्ह अँड लाते”ला म्हाडाची नोटीस
वर्सोवा येथे असलेले ‘हॉटेल लव्ह अँड लाते’ हे फिल्म अभिनेता सोनू सूद याचं
या हॉटेलमधील बेकायदेशीर कामाबद्दल अनेक नोटिसा बजावल्या होत्या
अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कायम लोकांच्या मदतीला धावतो आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. पण आता अभिनेता स्वतः मोठ्या अडचणीत अडकला आहे. मुंबई अभिनेत्याचं आलिशान हॉटेल आहे. पण त्यावर बुलडोझर चालवला जाऊ शकतो… अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हाडाने सोनू सूदच्या हॉटेलला बेकायदेशीर काम हटवण्यासाठी नोटीस बजावली आहे. म्हाडाने “हॉटेल लव्ह अँड लाते”ला नोटीस बजावली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा येथे असलेले ‘हॉटेल लव्ह अँड लाते’ हे फिल्म अभिनेता सोनू सूद याचं आहे आणि यावेळी अभिनेत्याने स्वतःचा वाढदिवसही तिथेच साजरा केला. सोनू सूदचं ऑफिसही येथेच आहे. हे ‘हॉटेल लव्ह अँड लाते’ वर्सोवा सात बंगल्याच्या आराम नगरमध्ये आहे. म्हाडाने त्यांच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, त्यांनी या हॉटेलमधील बेकायदेशीर कामाबद्दल अनेक नोटिसा बजावल्या होत्या, परंतु कोणतेही पुरावे देण्यात आले नव्हते. सुनावणीदरम्यान अभिनेता न्यायालयात हजर राहिला नाही.
म्हाडाने हॉटेलला दिलेल्या नोटीसमध्ये लिहिले आहे की आपणास दिनांक 18.09. 2025 रोजी सुनावणी करीता नैसर्गिक न्यायसंधी दिली असता सुनावणीस गैरहजर राहिले असल्याने तसंच अद्याप परवानगी विषयक कोणतीही कागदपत्रे या कार्यालयास सादर केलेले नाही. त्यामुळे आपणांस उपरोक्त नमूद ठिकाणी केलेले विनापरवाना बेकायदेशीर वाढीव बांधकाम तत्काल काढून घेऊन सदरची जगा पूर्ववत करणे बाबत आदेशित करण्यात येत आहे.
नोटीसमध्ये असेही लिहिले आहे की आपणंमार्फत सदरचे विनापरवाना बेकायदेशीर वाढीव बांधकाम काढण्यास कसूर केलेली आहे.. असे अस्पष्ट झाल्यास सदरचे वाढीव बांधकाम या कार्यालय मार्फत तातडीने निष्कासित करण्यात येईल. शासकीय यंत्रणेसह या कामी आलेल्या खर्च आपणाकडून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 53 (6) प्रमाणे जमीन महसुलीची थकबाकी प्रमाणे वसूल करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. हॉटेलला कलम 52 आणि 53 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. अभिनेता सोनू सूद याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळ स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर, कोराना काळात देखील अभिनेत्याने अनेकांची मदत केली.