ताज्या बातम्या

MHADA : म्हाडाच्या जमिनींची जीआयएस मॅपिंगद्वारे होणार मोजणी

म्हाडाच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, अतिक्रमण, आरक्षण बाबत माहिती मिळणार एका क्लीकवर

Published by : Shweta Chavan-Zagade

संजय गडदे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) मुंबईसह संपूर्ण राज्यभरातील विभागीय मंडळांच्या अखत्यारीतील जमिनींची अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण आणि मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून म्हाडाकडून जीआयएस (Geographical Information System) मॅपिंग व आरपीए (Robotic Process Automation) या संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून म्हाडाला स्वमालकीच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेले अतिक्रमण, आरक्षण निहाय रिक्त भूखंडांची उपलब्धता याबाबत माहिती एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे ज्यामुळे या जमिनींचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करणे शक्य होणार आहे.

जीआयएस मॅपिंग व आरपीए या संगणकीय प्रणालींच्या सहाय्याने राज्यातील म्हाडाच्या जमिनीशी संबंधित विविध अभिलेखांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे म्हाडाच्या मुंबईसह राज्यातील विभागीय मंडळांच्या अखत्यारीतील जमिनींचे प्रचलित कायदे व नियमावलींच्या वापराबाबतचे नियोजन तसेच सदर भूखंडांवर आर्थिक व बांधकाम योग्य क्षमता यांबाबत माहिती संकलित केली जाणार असून कामकाजाच्या विविध टप्प्यांवर या माहितीचा उपयोग करता येणार आहे.

याकामी RAH Infotech, CE Infosystem Ltd, Replete Business solutions Pvt. Ltd. यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. तसेच या संपूर्ण कार्यप्रणालीवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याकरिता तसेच वेळोवेळी कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीवर प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, मुंबई मंडळातील कार्यकारी अभियंता (शहर), कार्यकारी अभियंता (वांद्रे विभाग), वास्तुशास्त्रज्ञ व रचनाकार, भू व्यवस्थापक आदींचा समावेश असणार आहे.

म्हाडा प्रशासनातर्फे सर्व शासकीय संस्था, म्हाडा विभागीय कार्यालये, गृहनिर्माण संस्था, वसाहती, चाळी इत्यादींनीं याकामी संबंधित एजन्सींना सहकार्य करावे आणि सर्वेक्षणाकरिता आवश्यक असलेली माहिती तात्काळ उपलब्ध करवून देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार