मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वीच आता म्हाडा लॉटरी निघणार आहे. यंदाच्या वर्षात देखील दिवाळीपूर्वीच मोठी लॉटरी काढली जाणार असून मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5 हजार घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.
म्हाडाने पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात 19,497 घरं बांधणीचं उद्दिष्ट ठेवलं असून मुंबईत 5199 घरं बांधली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात 5199 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन 2025-2026 च्या अर्थसंकल्पात 5749.49 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.