ताज्या बातम्या

'वानखेडे'वर हिटमॅनची धमाकेदार खेळी; मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर वानखेडे स्टेडियममध्ये 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे.

Published by : Team Lokshahi

वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रंगलेल्या IPL 2025 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर वानखेडे स्टेडियममध्ये 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. या विजयात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची धमाकेदार खेळी महत्वाची ठरली.

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचत चेन्नईवर तब्बल 9 विकेट्सने विजय मिळवला. सामन्याची सुरुवात चेन्नईने टॉस जिंकून फलंदाजीची निवड केली. ऋतुराज गायकवाड (42) आणि शिवम दुबे (56) यांनी अर्धशतकी भागीदारी करत धावसंख्या उंचावली. धोनीने अखेरच्या षटकांमध्ये संघाला 176 धावांपर्यंत नेले. मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत चेन्नईच्या धावसंख्येला नियंत्रणात ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.

हा सामना रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या आक्रमक आणि तडाखेबाज फलंदाजीमुळे कौतुकास्पद ठरला. रोहितने 45 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. या विजयानंतर मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी पोहचली आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने या सामन्यात अर्धशतक झळकावलं. रोहित आणि सूर्याने दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची नाबाद भागीदारी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा