ताज्या बातम्या

Kalyan News : कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीय महिलेची मुजोरी, मनसे आक्रमक

महाराष्ट्रात मराठी वि. हिंदी असा वाद अनेकदा पेटताना दिसतो, (Kalyan News) अनेक जणांना मराठी बोलता येतं, समजतं देखील पण तरीही काही जण मुद्दाम मराठी बोलण्यास नकार दत हिंदीचाच आग्रह धरतात.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • कल्याणच्या डी-मार्टमध्ये मराठी-हिंदी भाषेवरून मोठा वाद

  • मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल वापरले आक्षेपार्ह शब्द

  • तुम्ही मराठी लोक कचरा आहात आमच्या जीवावर जगता

महाराष्ट्रात मराठी वि. हिंदी असा वाद अनेकदा पेटताना दिसतो, अनेक जणांना मराठी बोलता येतं, समजतं देखील पण तरीही काही जण मुद्दाम मराठी बोलण्यास नकार दत हिंदीचाच आग्रह धरतात. मराठी बोलणाऱ्यांशी गैरवर्तन करतात, त्यांच्यासमोर मुजोरी दाखवतात आणि भाषेचा वाद पेटतो. कल्याणमध्ये याच प्रकाराची काल ( रविवार 12 ऑक्चोबर) पुनरावृत्ती घडली आणि भाषेवरून पुन्हा वाद झाला.

काल रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास कल्याण पश्चिम येथील डी मार्ट मध्ये मराठी–हिंदी भाषेवरून मोठा वाद झाला. डी मार्टमध्ये मराठी अमराठी भाषेवरून मोठा गोंधळ झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डी-मार्टमध्ये सामान खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेने कांऊटरवरील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. “माझ्याशी मराठीत नाही, हिंदीत बोला” — अशी मागणी त्या महिलेने केली. मात्र त्यानंतर डी-मार्टमधील कर्मचाऱ्यांनी “मला मराठी येते, मी हिंदीत बोलणार नाही” असे ठाम उत्तर दिलं आणि त्या मराठी बोलण्याच्याच भूमिकेवर ठाम राहिल्या.

तुम्ही मराठी लोक कचरा आहात आमच्या जीवावर जगता

मात्र ते पाहून ती महिला भडकली आणि तिने जोरदार गोंधळ घातला. ” तुम्ही मराठी लोक कचरा आहात आमच्या जीवावर जगता, आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला आहे ” असे बोलत त्या महिलेने आकांडतांडव केले, त्यामुळे सगळं वातावरण तापलं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र ते ऐकून तेथे उपस्थित असलेले लोक भडकले. त्या ठिकाणी असलेल्या काही इतर मराठी ग्राहकांनी या महिलेचा विरोध केला, आणि मनसे कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली.

मनसेची आक्रमक भूमिका

या घटनेबद्दल समजताच मनसे कार्यकर्त्यांनी ताबडतोबत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी डी-मार्टच्या बाहेर उभं राहून मराठी लोकांबद्दल वाट्टेल ते बोलणाऱ्या महिलेला, तसेच तिचा मुलगा आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांना याबद्दल जाब विचारला आणि आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या या भूमिकेनंतर डी मार्ट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले.

महाराष्ट्रात राहून मराठी लोकांबद्दल उलटसुलट बोलणाऱ्या, मराठी भाषेत संवाद साधण्यास नकार देणाऱ्या त्या महिलेचा मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला, तिच्याकडून माफीची मागणी करण्यात आली. माफी मागितल्यानंतरच बाहेर जाता येईल अशी ठाम भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. अखेर वाढत्या विरोधा समोर ती महिला झुकली आणि तिने आपण वापरलेल्या शब्दांबद्दल सपशेल माफी मागितली. तिने सर्वांसमोर हात जोडून मी मराठी आहे, मी मराठीत बोलते, असे सांगत मनसे कार्यकर्त्यांची माफी मागितली.

अखेर माफी मागितल्यानंतर मराठी विरुद्ध हिंदी वादावर पडदा पडला! त्या महिलेने माफी मागितल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तेथून पाय काढता घेतला. दोघांनीही परस्पराविरोधात पोलिसात तक्रार न करता घेतली माघार. तणावानंतर दोन्ही बाजूंनी तक्रार न करता दोघांनीही माघार घेतली. यासंदर्भात खडकपाडा पोलिसांकात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा