ताज्या बातम्या

दूध महागले; आजपासून नवे दर लागू

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : देशात महागाई उच्चांक गाठत असतानाच अमूलने दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. आजपासून ही वाढ लागू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु, सर्वसामन्यांच्या खिशाला महागाईची झळ सोसवी लागणार आहे.

अमूलने दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. अमूलसोबतच मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवले आहेत. नवीन दर 17 ऑगस्ट म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत. अमूलच्या दुधाच्या दरातील वाढ दिल्ली आणि एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र व्यतिरिक्त अमूलची उत्पादने विकल्या जाणाऱ्या इतर सर्व ठिकाणी लागू होईल.

म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन तर गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासंबंधी अमूल आणि मदर डेअरीने अधिकृतपणे माहिती दिली आहे. अमूल कंपनीचा एकूण खर्च आणि इतर खर्च वाढल्यानं कंपनीने दुधाच्या दरात वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे.

किती रुपयांनी महागलं दूध?

दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांनी वाढ होणार आहे. यामुळे अमूल गोल्ड दुध प्रतिलीटर ६२ रुपये, अमूल शक्ती दूध ५६ रुपये व अमूल ताजाचा दर ५० रुपये प्रति लिटर असेल. तर अर्धालिटर अमूल गोल्ड ३१ रुपये आणि अमूल ताजा २५ रुपयांना तर अमूल शक्तीचा दर २८ रुपये याप्रमाणे असेल.

तर, मदर डेअरीने प्रति लिटर फुल क्रीम दुधाला 61 रुपये, टोन्ड दुधाला 51 रुपये आणि डबल टोन्डला 45 रुपये, तर गाईच्या दुधाला आता 53 रुपये मोजावे लागणार आहेत. स्थानिक पातळीवर मात्र फॅटनुसार दर हे ठरवून दिले गेले आहेत.

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो

Anand Dave : मोदींना जिरेटोप घालण्याची हिम्मतच कशी? आनंद दवेंचा प्रफुल्ल पटेल यांना सवाल

NCERT Recruitment 2024: एनसीईआरटीमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी...

अमरावती पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन

Konkan: कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार?