मंत्री भरत गोगावले यांना तातडीने मुंबईकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला असल्याची बातमी काही माध्यमांनी दाखवली होती. यावर आता भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "मी माझ्या मतदारसंघातील कार्यक्रमात आहे. मला शिंदेसाहेबांचाही फोन आलेला नाही, असं स्पष्टीकरण भरत गोगावलेंनी 'लोकशाही मराठी'ला दिलं आहे. काही माध्यमांनी चुकीची माहिती चालवली," असं भरत गोगावलेंनी स्पष्ट केलं आहे.
मंत्री भरत गोगावले हे त्यांच्या रायगडमधील मतदारसंघात व्यग्र असून त्यांना एकनाथ शिंदे यांचा फोन आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्री गोगावले हे माणगाव तालुक्यातील कार्यक्रमात सहभागी झाले असून संध्याकाळी एका सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.