विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या चौकशीच्या मुद्यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
जयकुमारा गोरे म्हणाले की, "नाव प्रभू श्रीरामाचे आणि काम मात्र शकुनी मामाचं. नाव राम असले म्हणून कुणी प्रभू श्रीराम होत नाही. तपास यंत्रणेमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. ज्या गोष्टी तपासामध्ये आल्यात त्यांचीच चौकशी सुरू आहे. ज्यांची चौकशी सुरू आहे त्यांनी पुढे येऊन सांगावं की हा आवाज माझा नाही मी या षडयंत्रा मध्ये नव्हतो", ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकर यांना टोला लगावत आव्हान केलं आहे.
चौकशीबाबत रामराजे निंबाळकर यांनी स्वतःहून स्पष्टीकरण द्यावे रोहित पवार त्यांची वकिली का करत आहेत ? जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना देखील सवाल केला आहे. "तुम्ही केलेल्या अनेक षड्यंत्राचे दुःख सोसून आम्ही इथपर्यंत पोचलोय. रोहित पवारांनी मला सत्ता आणि संघर्षाचे शहाणपण शिकवू नये. येत्या काही दिवसात आणखीन मोठ्या घडामोडी घडतील. रोहित पवारांनी सत्तेच्या सोज्वळ धमक्या आम्हाला देऊ नये".