माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. नावट दस्तावेजाच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने ॲड. कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
कोकाटेंकडून शिक्षेला आव्हान देणारी याचिका सादर करण्यात आली त्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावर आज सुनावणी पार पडली. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असून नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.