7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला असून कालपर्यंत 280 आमदारांनी शपथ घेतली तर काल उर्वरित 8 आमदारां शपथ घेतली आहे. काल विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
तर आता विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. राज्यपालांचे अभिभाषण व विधानसभा अध्यक्षांची निवड 9 डिसेंबरला मुंबईत झाली आहे. महायुतीत कोण होणार मंत्री याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाले आहेत. संजय राठोड आणि अब्दूल सत्तार यांची मंत्रिपदाची कामगिरी असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्रिपदासाठी पास झालेले आमदार
तानाजी सावंत
दिपक केसरकर
भरतशेठ गोगावले
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भूसे
शंभूराजे देसाई
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
अर्जून खोतकर
विजय शिवतारे