ताज्या बातम्या

गांधी कुटुंबाला गृह मंत्रालयाचा मोठा धक्का! राजीव गांधी फाऊंडेशनचा परवाना रद्द

केंद्र सरकारने गांधी कुटुंबाला आज मोठा झटका दिला आहे. गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गांधी कुटुंबाला आज मोठा झटका दिला आहे. गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला आहे. परदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप संघटनेवर ठेवण्यात आला आहे.

माहितीनुसार, जुलै २०२० मध्ये गृह मंत्रालयाने चौकशी समिती स्थापन केली होती. त्याच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या तपास समितीमध्ये एमएचए, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. परवाना रद्द करण्याची नोटीस राजीव गांधी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्याला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जून 2020 मध्ये भाजपने फाउंडेशनवर परदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. तत्कालीन कायदा मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने आर्थिक मदत केल्याचा दावा केला होता. सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही पक्ष परदेशातून पैसा घेऊ शकत नाही, असा कायदा आहे. या देणगीसाठी सरकारकडून मंजुरी घेण्यात आली होती का, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. इतर विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश आहे. राजीव गांधी फाउंडेशनची 1991 मध्ये स्थापना झाली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा