ताज्या बातम्या

Punjab Crime : भयंकर! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून चालत्या कारमध्ये अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

पंजाबमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीवर चालत्या कारमध्ये त्या नराधमांनी बलात्कार करून तिला अपहरणस्थळी पुन्हा सोडून दिल्याचे समजते.

Published by : Rashmi Mane

पंजाबमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीवर चालत्या कारमध्ये त्या नराधमांनी बलात्कार करून तिला अपहरणस्थळी पुन्हा सोडून दिल्याचे समजते. 23 जुलै रोजी दोन अज्ञात पुरूषांनी 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून चालत्या कारमध्ये बलात्कार केला. त्यानंतर तिला अपहरणाच्या ठिकाणी सोडून दिल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. मोहालीतील झिरकपूर येथे चंदीगड-अंबाला राष्ट्रीय महामार्गाजवळ व्हीआयपी रोडवरील मेट्रो मॉलजवळ रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती एका सलूनमधील काम संपवून ऑटोरिक्षाची वाट पाहत असताना दोन्ही आरोपींनी तिला जबरदस्तीने कारमध्ये ओढले. प्रवासादरम्यान त्यांनी तिला मारहाण केली आणि चंदीगडमधील ट्रिब्यून चौकजवळील एका निर्जन भागात नेले. हल्लेखोरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करताना तिच्या भावाचे नाव घेतल्याचे समजते. गुन्हा केल्यानंतर त्यांनी तिला परत त्याच ठिकाणी सोडले जिथून तिचे अपहरण केले होते.

याप्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर झिरकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू आहे.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

India Vs England 4th Test Match : आजचा दिवस ठरणार निर्णायक; सामना जिंकून भारत बरोबरीला येणार की इंग्लंड बाजी मारणार ?

Latest Marathi News Update live : पुणे शहरात कचरा संकलन अधिक कार्यक्षम करण्यासाठी 'इंदूर पॅटर्न' राबविणार

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; पुणे, सातारा, कोकणात ऑरेंज, तर मुंबईला यल्लो अलर्ट जारी

Shravan 2025 : श्रावणात भाविकांसाठी एसटीची विशेष सुविधा; भीमाशंकरसाठी सोडणार 80 बसेस