Rape Team Lokshahi
ताज्या बातम्या

Rape case : आठ वर्षीय चिमुकलीवर ३८ वर्षीय नराधमाचा अत्याचार

पोलिसांची तत्परता! अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या काही तासांतच आवळल्या मुसक्या

Published by : Team Lokshahi

मुंबई : महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर (Minor girls) होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (Police) तत्परता दाखवत अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सदर आरोपी ३८ वर्षांचा असून याआधी देखील त्याच्यावर पॉस्को (Posco) कायद्यातंर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

माहितीनुसार, आठ वर्षांची पीडिता मुंबईच्या आग्रीपाडा येथे आपल्या आजीसोबत राहते. शुक्रवारी संध्याकाळी चिमुरडी आईस्क्रीम आणण्यासाठी इमारतीच्या खाली आल्यानंतर ३८ वर्षीय आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. बराच वेळ आपली नातं घरी परतली नाही म्हणून आजीने इमारतीच्या खाली बराच वेळ शोधाशोध केली आणि काही वेळानंतर ही चिमुरडी परिसरातील गणराज इमारतीच्या खाली शांत उभी असल्याचे आढळून आले. मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर ही मुलगी जोरजोरात रडायला लागल्याने आजीला अनुचित घडले असल्याचा संशय आला. आजीने शेजारच्यांना याबाबत सांगितले असता शेजारील महिलेने पीडित मुलीस विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यानंतर परिसरात राहणाऱ्या तरुणाने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती चिमुरडीने दिली.

याप्रकरणी आजीने पोलिसांना १०० नंबरवर या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली व मुलीची नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

या प्रकरणात ३८ वर्षाच्या एका नराधमास अटक करण्यात आली असून पुढील तपास आग्रीपाडा पोलीस करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा