बिहारमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. मुजफ्फरपूरमधल्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. बलात्कार करण्याऱ्या आरोपीने इसमाने तिचा गळा चिरला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. पीडित मुलगी अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा शोध घेणाऱ्या आईलाच ती सापडली. त्या अवस्थेत पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र तिला उपचारांसाठी पाच तास वाट बघावी लागली. कारण तितका वेळ पीडितेला बेड मिळाला नाही. बेड मिळाल्यानंतर तिच्यावर पाच तासांनी उपचार सुरु करण्यात आले. अखेर दुसऱ्या दिवशी उपचारांच्या दरम्यान या पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुलीच्या पालकांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर या घटनेने बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.