ताज्या बातम्या

Nashik News : "आई, तुला त्रास द्यायचा नाही पण..." नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुलींनी उचललं टोकाचं पाऊल, थक्क करणार कारण समोर!

नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by : Team Lokshahi

नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पहिल्या घटनेत डान्स क्लाससाठी हट्ट धरल्यावर नकार मिळाल्यानंतर एका अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात घातक द्रवपदार्थ (हार्पिक) पिऊन टोकाचे पाऊल उचलले. एप्रिल पासून तिच्यावर मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना म्हसरूळ परिसरात घडली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास सुरू आहे.

मुलीने 27 एप्रिल रोजी डान्स क्लाससाठी हट्ट केला होता. मात्र पालकांनी तत्काळ मंजुरी न दिल्यामुळे ती संतप्त झाली. याच रागातून तिने हार्पिक पिण्याचा निर्णय घेतला. ही घटना समजताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्राण वाचवण्यात अपयश आले. पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने तिच्या पालकांचे जबाब नोंदवले असून, पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, नाशिकमध्ये दुसऱ्या एका घटनेत, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या 20 वर्षीय मुलीने आत्महत्या केली.

“आई, तुला त्रास द्यायचा नाही,” अशा आशयाची चिठ्ठी लिहून तिने राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना आडगाव परिसरात घडली. आत्महत्या करणारी पूजा डांबरे नावाची तरुणी नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली होती. आईच्या कामाच्या वेळा, वाढता शिक्षण खर्च आणि मानसिक ताण यामुळे ती दीर्घकाळ नैराश्यात होती, अशी प्राथमिक माहिती आहे. या दोन घटनांमुळे मुलांमध्ये वाढणारे मानसिक दडपण, सहनशक्तीचा अभाव आणि पालकत्वातील संवादाचा अभाव यावर पुन्हा एकदा चिंतन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी महापालिकेचा मोठा निर्णय; 'पीएमसी रोड मित्र'ॲप, नागरिकांना थेट तक्रार करता येणार

Latest Marathi News Update live : अंजली दमानिया यांच्याकडून सावली बारची पाहणी

Pune : कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील 63 धोकादायक पूल पाडण्यात येणार

Purandar Airport : पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या कामाला गती येणार; पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास होकार