थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mira Bhayandar Leopard ) राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे.
यातच आता मिरा-भाईंदर शहरात बिबट्याची दहशत पसरली असून पहाटेच्या सुमारास बिबट्या लोकवस्तीमध्ये शिरल्याची घटना घडली. या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत चौघे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
बिबट्या दिसताच नागरिकांमध्ये घबराट उडाली. असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता वनविभाग, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नागरी वसाहतीत बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Summery
मिरा-भाईंदर शहरात बिबट्याची दहशत
पहाटे लोकवस्तीमध्ये शिरकाव
दोन नागरिक जखमी