ताज्या बातम्या

प्रियकराच्या घरी आक्षेपार्ह अवस्थेत सापडली फरार पत्नी; पतीने गावकऱ्यांसह थेट...

महिलेला गावातील काही लोकांनीच आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि कुटुंबीयांना पत्नीचा पत्ता लागला.

Published by : Sudhir Kakde

देवास : माणुसकीला लाजवेल अशी घटना छत्तीसगडमधील देवास जिल्ह्यामध्ये घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील पुंजापुरा गावातील असून, नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेली पत्नी प्रियकराच्या घरी सापडल्यानंतर संतापलेल्या पतीने गावकऱ्यांसह मिळून पत्नीला भयंकर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. सदर महिला 24 जून रोजी घरातून पसार झाली होती. पतीनं तिचा शोध घेतला असता, पत्नी सापडली नाही. अशा स्थितीत त्यांनी उदयनगर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. महिलेला तीन मुले, दोन मुली आणि एक मुलगा आहे.

महिलेला गावातील काही लोकांनीच आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि कुटुंबीयांना पत्नीचा पत्ता लागला. त्यानंतर पती आणि कुटुंबीय महिलेचा प्रियकर असलेल्या हरिसिंगच्या घरी पोहोचले. यावेळी महिला तिथे आढळून आली. त्यामुळे ते संतापले. गोंधळादरम्यान महिलेला घराबाहेर काढण्यात आलं, त्यानंतर गावातील लोकही जमा झाले. सर्वांनी मिळून महिलेच्या गळ्यात चप्पलचा हार घातला, केसांना पकडून मारहाण केली. मारहाणीदरम्यान महिला दोनदा बेशुद्ध पडून जमिनीवर पडली. पण लोक प्रेक्षक म्हणून हसत व्हिडिओ बनवत राहिले. एवढ्यावरच न थांबता, महिलेच्या खांद्यावर पतीला बसवलं आणि गावभर घेऊन फिरण्यास सांगितलं.

महिलेसोबतच्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणी उदयनगर पोलीस ठाण्यात पती मांगीलाल याच्यासह 15 जणांवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात