ताज्या बातम्या

चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर पलटवार, म्हणाल्या, "माझ्या कॅरेक्टरवर सतत..."

सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याला आता चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Published by : Team Lokshahi

भाजपाच्या आमदार चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. चित्रा वाघ यांनी विधान परिषदेमध्ये अनिल परब यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. यावरुन सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवारदेखील केले. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याला आता चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "ज्याची जशी लायकी तो तशीच वक्तव्य करतो. सुषमा अंधारे यांनी काल ज्या पद्धतीने माझ्याबद्दल ट्विट केलं, ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत वेडंवाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले. आता ह्यांचे सुरु झाले आहेत. सुषमा अंधारे काल माझ्याबद्दल इतकं घाण बोलल्या. अरे आम्हालाही घर-दार, संसार आहे ना? आम्ही काय रस्त्यावर पडलोय? मी एकच प्रश्न विचारला, तो जो कोण त्यांचा नवरा होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही. तो येऊन येऊन मीडियासमोर सांगतोय की, त्या लेकराचा डीएनए टेस्ट करा. खरंतर मला हे बोलताना वाईट वाटतंय. त्या लेकराचादेखील त्यात दोष नाही. तुम्ही आमचं बोलता. आम्ही तुमचं बोललो तर? तुमच्यात आणि आमच्यात फरक राहिला नाही".

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, "माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं. तो विषय मनिषा कायंदे यांनी काढला. मीच नाही आणखी काही सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. महिलांना हलक्यात घेऊ नका हा स्ट्राँग मेसेज यातून दिलाय. आमचा नवरा, मुलं काय करतात याचं तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही मुद्द्यावर बोलाना, हेच तर मी म्हटलं. हे कधी होतं, जेव्हा तुमच्याकडे बोलायला काही नाही तेव्हा चित्रा वाघ आणि मग किती पुरुष पायाला बांधले, अरे ही नीच प्रवृत्ती आहे. कधी थांबणार? पुरुष नाही ह्यांच्यासारख्या. ह्यांच्या डोक्यात स्त्री-पुरुषाला जोडण्याशिवाय काहीच नाही. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा