ताज्या बातम्या

आपली उमेदवारी फिक्स ..! आमदार प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट चर्चेत

चंद्रपूर -आर्णी लोकसभा मतदारसंघात एकीकडे भाजपाने प्रचाराचा नारळ फोडला.

Published by : Siddhi Naringrekar

चंद्रपूर -आर्णी लोकसभा मतदार संघात एकीकडे भाजपाने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेस कुणाला उमेदवारी देतेय याके लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, आदरणीय बाळूभाऊंच्या पश्चात आपण सर्वांनी अतिशय धीराने आणि धैर्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विचारांची आणि विधायक कार्याची पताका धरून ठेवली आहे. आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्याच धीराने आणि धैर्याने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. काळ फिरत राहतो. थांबणे हा त्याचा धर्म नाही.

पण तरीही मागील लोकसभा निवडणुकीत अगदी निवडणुका तोंडावर असताना आदरणीय बाळूभाऊ यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. आणि त्यानंतर आपण सर्व कार्यकर्त्यांनी गाजवलेलं रणमैदान निकालाच्या रुपाने सगळ्या जगानं पाहिलं होते. आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदलली नाहीये. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपणा सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे. असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा