उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यात लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. नारायणगाव येथे शुक्रवारी (दि. २८) रोजी शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्नरचे अपक्ष आ. शरद सोनवणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार माजी आमदार बाळासाहेब दांगट , पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे , ठाकरे गटाचे नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे , माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके आदी सह लोकसभा मतदार संघातील विविध पक्षातील ४०० कार्यकर्ते,पदाधिकारी यांचेसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यांमुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे .
शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली. शरद सोनवणे यांच्या या निर्णयामुळे जुन्नर मतदारसंघात अजित पवार आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. या अटितटिच्या लढतीमध्ये शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके याचा पराभव केला.
दरम्यान, शरद सोनवणे यांनी महायुतीत असताना राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.