ताज्या बातम्या

माजी आमदारांच्या वाहनांवर आमदारांचे स्टिकर लावून दिशाभूल ?

वाहनावर राजमुद्रा असलेले महाराष्ट्र विधानसभा सदस्य असल्याचे स्टिकर

Published by : Team Lokshahi

भूपेश बारंगे,वर्धा

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी वाहनावर आमदार असल्याचे राजमुद्रा असलेले स्टिकर लावण्यात आले आहे. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार असे लिहिले स्टिकर लावून दिशाभूल करत आहे.

माजी आमदार राजू तोडसाम यांच्या स्वमालकीच्या फॉर्च्युनर महा 29 एटी 0750 क्रमांकाच्या गादीवर समोरील काचावर स्टिकर लावण्यात आले आहे. या वाहनावर आमदार असल्याचे स्टिकर लावून प्रवास करताना दिसत आहे. वर्ध्यात बी आर एस पक्षाचे पत्रकार परिषद घेण्यात आले त्यावेळी माजी आमदार राजू तोडसाम आपल्या वाहनाने वर्ध्याच्या विश्रामगृहात आले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनावर चक्क आमदार असल्याचे स्टिकर लावल्याचे दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. माजी आमदारांच नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसून आले. यांच्यावर काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

मात्र माजी आमदारांनी ही गोष्ट फेटाळून लावली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा