Sharad Pawar vs Sunil Shelke 
ताज्या बातम्या

शरद पवारांच्या टीकेला आमदार सुनील शेळकेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, "अजित पवारांना खलनायक...."

आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर सडकून टीका केलीय.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका केली होती. कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी शरद पवारांनी सुनील शेळके यांना धारेवर धरलं होतं, याच पार्श्वभूमीवर शेळके यांनी पत्रकार परिषदेत घेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, "पुढील आठ दिवसात मी दम दिलेली एकतरी व्यक्ती समोर आणा. आरोप करण्यापूर्वी शरद पवारांनी पुरावा द्यावा. शरद पवारांच्या वक्तव्यानं मला आश्चर्य वाटलं. मेळाव्याच्या आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली.अजित पवारांना खलनायक करण्याचा प्रयत्न करु नये."

तुला आमदार कुणी केलं, माझ्या वाट्याला कुणी गेलं तर मी त्याला सोडत नाही, असं शदर पवार म्हणाले होते. यावर उत्तर देताना शेळके म्हणाले, अजित पवारांना खलनायक करण्याचा प्रयत्न करु नये. आरोप करण्यापूर्वी शरद पवारांनी पुरावा द्यावा.

मावळ तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. मावळ तालुक्यातील जनतेला दहशत, दादागिरी, गुंडशाही, झुंडशाही चालत नाही. मावळ तालुका विकासकामांना प्राधान्य देणारा आहे. आम्ही अजितदादांच्या सोबत उभे आहोत, असंही शेळके म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा