ताज्या बातम्या

Suresh Dhas : पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान

  • पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषण

  • आमदार सुरेश धस यांनी या पूरग्रस्त भागामध्ये पाहणी केली

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शिरुर, कासार आणि पाटोदा शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

आज भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी या पूरग्रस्त भागामध्ये पाहणी करत नागरिकांना आणि शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच तात्काळ 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 हजाराची मदत प्रशासनाच्या वतीने स्थानिक नागरिकांना देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आमदार सुरेश धस यांनी पाटोदा शहरासह शेतीच्या बांधावर जाऊनया दौऱ्यात पिकांची पाहणी केली.

यानंतर माध्यमांशी बोलताना ज्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले आहेत, जमीन वाहून गेल्या आहेत, मोटर वाहून गेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना देखील तात्काळ मदत देण्यात येणार आहे अशी माहिती दिली. तसेच आष्टी मतदारसंघातील जवळपास 250 घरांमध्ये पटोदा शहरात पाणी शिरले, तर जवळपास 46 घरांमध्ये शिरूर कासार शहरातील पाणी शिरल्याचीही आमदार सुरेश धस यांनी माहिती यावेळी दिली.

तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे सिंदफणा नदीला महापूर आल्याने नांदुर हवेली गावातील अनेक घरात पाणी शिरले होते. मोठ्या प्रमाणात घरात पाणी घुसल्याने अनेक नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. या गावात मंत्री गिरिश महाजन यांनी भेट देत मदत करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. हवामान विभागाने राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय वर्तवली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी सर्तक राहावे असे आवाहन देखील देण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Navaratri 2025 : दुर्गादेवीला महिषासुर -मर्दिनी का म्हणतात? , जाणून घ्या 'ही' कथा

H-1B Visa : भारतीय विद्यार्थ्यांच्या करिअरला धक्का! ; एच-१बी व्हिसा शुल्कात इतक्याची वाढ

Flipkart Big Billion Sale : फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोठा झोल, Iphone ची ऑर्डर आपोआप रद्द?

Make Fasting Gulab jamun during Navratri : आता नवरात्रीमध्ये बनवा उपवासाचे गुलाबजाम