ताज्या बातम्या

KDMC : रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवा, आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipality) हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असल्याने हे खड्डे लवकरात लवकर बुजवा, अशी मागणी शिंदे गटाला समर्थन देणारे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

अमझद खान | कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipality) हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असल्याने हे खड्डे लवकरात लवकर बुजवा, अशी मागणी शिंदे गटाला समर्थन देणारे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.

आमदार भोईर यांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक रवी पाटील, विद्याधर भोईर, छाया वाघमारे,प्रभूनाथ भोईर, मयूर पाटील, हर्षदा थवील आदी उपस्थित होते. आमदार भोईर यांनी सांगितले की, आयुक्त नवे आहेत. त्यांना काही अवघी द्यायला हवा. रस्त्यावरील खड्डे पडले. मात्र पावसाने उघडीप न घेतल्याने खड्डे बुजविने प्रशासनाला शक्य नव्हते. आत्ता लवकर खड्डे बुजविले जातील असे आश्वासन आयुक्तांनी आमदार भोईर यांनी दिले आहे.

महापालिका निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. एका प्रभागातील दोन ते तीन हजार मतदाराची नावे दुस:याच्या प्रभागात टाकण्यात आली आहे. ही बाब गंभीर असून त्यावर आमदारांनी आयुक्तांनी लक्ष वेधले. त्यावर आयुक्तांनी निवडणूक आयोगाशी बोलून ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

या महत्वाच्या मुद्यासह आमदार भोईर यांनी शहरातील स्वच्छता, घनकचरा, पडलेला कचरा नियमित उचलला जावा. कचरा वेळीच उचलला गेला नाही तर पावसाळ्य़ात रोगराई पसरली जाण्याची श्कयात व्यक्त केली. त्याचबरोबर आपतकालीन परिस्थितीत महापालिकेची काय तयारी आहे. त्याचीही माहिती आमदारांनी आयुक्तांकडून घेतली. पावसाचे पाणी एकाही नागरीकाच्या घरात शिरणार नाही अशी दक्षता प्रशासनाकडून घेण्यात यावी अशीही मागणी आमदारांनी यावेळी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य