ताज्या बातम्या

अपघातानंतर आमदार योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया

Published by : Siddhi Naringrekar

आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा (Yogesh Kadam Car Accident) रायगड हद्दीत अपघात झाला आहे.सुदैवाने आमदार योगेश कदम अपघातानंतर सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या चालकाला (Driver) मात्र किरकोळ दुखापत झालीये. अपघातानंतर चोळई येथील शासकीय रूग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. योगेश कदम म्हणाले की, मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला होता. रात्री 10.15 च्या सुमारास हा अपघात झाला होता. परंतु आई जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी आणि माझे सर्व सहकारी सुखरूप आहोत. आमची चिंता करू नका. आज एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो आहोत. मला कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही. त्यासोबतच माझे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडणार आहे. असे त्यांनी सांगितले.

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट

हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी