Google Lokshahi
ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election: आमदार योगेश टिळेकरांनी महाविकास आघाडीवर साधला निशणा; म्हणाले, "त्यांच्या आमदारांचा..."

विधान परिषद निवडणुकीत महायुतीने ९ पैकी ९ जागा जिंकून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं विजयश्री खेचून आणल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Published by : Naresh Shende

Yogesh Tilekar On Mahavikas Aaghadi: विधान परिषद निवडणुकीत महायुतीने ९ पैकी ९ जागा जिंकून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं विजयश्री खेचून आणल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. अशातच विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. "खोटं नरेटिव्ह सेट केलं, संविधान बदलणार असा खोटा प्रचार त्यांनी केला. तरीसुद्धा त्यांना मोठं यश मिळालं नाही. त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचा त्यांच्यावर विश्वास नाही, हे त्यांना आता कळलं आहे, असं टिळेकर म्हणाले.

टिळेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांनी मला ही संधी दिली आहे. त्या संधीचे रूपांतर चांगल्या गोष्टीत करण्यासाठी मी इथे आलो आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विश्वासाने मला संधी दिली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत युवक आणि माळी समाज भाजप पक्षाशी कसा जोडावा, या संदर्भात साहेबांनी मार्गदर्शन केलं.

आम्ही विधानसभेला 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणू, असं जे म्हणतात. त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. महायुतीने ही निवडणूक खंबीरपणे लढली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी आम्हाला मदत केली. शिवसेनेने जर दुसरा उमेदवार उभा केला असता, तर त्यांना काय मेहनत करावी लागली असती, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे, असंही टिळेकर म्हणाले.

शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर विधान परिषदेचे नवनिर्वाचीत आमदार सदाभाऊ खोत यांनीही मोठी प्रतिक्रिया दिलीय. शरद पवारांवर टीका करताना खोत म्हणाले, एका शेतकरी नेत्याला उभं करताना, ते निवडून येतील का ?याची पहिल्यांदा त्यांनी खातरजमा करायला हवी होती. जयंत पाटील यांचा पराभव म्हणजे या महाराष्ट्रातल्या श्रमिकांचा पराभव आहे. हे शरद पवार यांनी घडवून आणलं आहे. शेतमजूरांचा अपमान शरद पवार यांनी केला आहे, म्हणून शरद पवार यांनी चळवळी करणाऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज